मित्रांबरोबर पार्टी करताना ३० वर्षीय गायिकेचा मृत्यू, निधनाचं कारण अस्पष्ट

Apr 12, 2024 - 14:16
 10
Google  News Join WhatsApp Join Telegram Live

मित्रांबरोबर पार्टी करताना ३० वर्षीय गायिकेचा मृत्यू, निधनाचं कारण अस्पष्ट

Panchayat Swaraj Samachar News Desk.

प्रसिद्ध कोरियन गायिका पार्क बो राम हिचा ३०व्या वर्षी संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. ११ एप्रिलला रात्री ११च्या सुमारास पार्क बो राम हिचं निधन झाल्याची माहिती एक्सएएनएडीयू एंटरटेनमेंट या तिच्या एजन्सीकडून देण्यात आली आहे. तिच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. तिच्या अचानक झालेल्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला असून कोरियन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 

पार्क बो राम हिच्या मृत्यूबाबतच कोरियातील नामयांगजू पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकारणाचा पोलीस तपास करत असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झाला त्यावेळी कोरियन गायिका मित्रांबरोबर पार्टी करत होती. १० वाजताच्या आसपास पार्क बाथरुममध्ये गेली होती. बऱ्याच वेळानंतरही ती बाहेर न आल्याने तिच्या मित्रांनी बाथरुमचा दरवाजा उघडल्यानंतर पार्क बेसिनजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर त्यांनी ११९ या इमर्जन्सी नंबरवर कॉन्टॅक्ट केला. त्यानंतर पार्कला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री ११:१७ वाजण्याच्या आसपास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिच्या मृत्यूमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. 

एक्सएएनएडीयू एंटरटेनमेंट एजन्सीकडून पार्क बो राम हिच्या निधनाचं वृत्त देण्यात आलं आहे. त्यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, "११ एप्रिलला पार्क बो राम आपल्याला अचानक सोडून गेली आहे. तिच्या चाहत्यांना ही दु:खद बातमी देताना आम्हाला त्रास होत आहे. गायिकेच्या कुटुंबीयांशी चर्चा करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील". 

पार्क बो राम हिने १७व्या वर्षी के पॉप इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं होतं. २०१० मध्ये तिने सुपरस्टार के २ या शोमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये तिने टॉप ८ मध्ये जागा मिळवली होती. या शोमुळे पार्कला लोकप्रियता मिळाली. ‘सॉरी’, ‘प्रिटी बे’, ‘डायनॅमिक लव्ह’, ‘सेलेप्रिटी’, 'ब्यूटिफूल' ही तिची काही गाजलेली गाणी आहेत. 

Google News Join Facebook Live 24/7 Help Desk

Tags: