राज ठाकरे आमच्या सोबत आले तर रेड कार्पेटवर स्वागत करू; महायुतीच्या बड्या नेत्याच्या विधानाने पुन्हा चर्चा

Apr 6, 2024 - 13:45
 7
Google  News Join WhatsApp Join Telegram Live

राज ठाकरे आमच्या सोबत आले तर रेड कार्पेटवर स्वागत करू; महायुतीच्या बड्या नेत्याच्या विधानाने पुन्हा चर्चा

Panchayat Swaraj Samachar News Desk.

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा जवळ आला तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले पत्ते खोललेले नाहीत. राज ठाकरे महायुतीत येणार की नाही याबाबत मनसेकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतरही राज यांनी आपले पत्ते उघड केले नाहीत. त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे. राज ठाकरे यांचा येत्या 9 एप्रिल रोजी शिवाजी पार्कवर गुढी पाडवा मेळावा आहे. त्यात ते भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यापूर्वीच महायुतीच्या एका नेत्याने मनसे आणि महायुतीच्या युतीबाबत भाष्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

महायुतीतील एक प्रमुख नेते आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मनसेसोबतच्या युतीवर विधान करून चर्चांना तोंड फोडले आहे. राज ठाकरे हे वरिष्ठ नेते आहेत. ते महायुतीत येणार की नाही याबाबत बोलण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. मात्र ते आले तर त्यांचे स्वागतच होईल. रेड कार्पेटवर त्यांचे स्वागत केले जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांची सभा आहे आणि या सभेच्या दिवशी राज ठाकरे महत्त्वाची घोषणा करू शकतात, असं संजय शिरसाट म्हणाले. शिरसाट मीडियाशी संवाद साधत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणची जागा श्रीकांत शिंदे हेच लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावरही संजय शिरसाट यांनी विधान केलं आहे. श्रीकांत शिंदे यांनी अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवलीसाठी बरीच विकासाची कामे केलेली आहेत. त्यामुळे त्यांचे या उमेदवारीच्या सर्व स्तरातून स्वागत होत आहे. कुठलेही मतभेद नाहीत. कुठलाही समन्वयाचा अभाव नाहीये. आम्ही सर्व मिळून श्रीकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं शिरसाट म्हणाले.

Google News Join Facebook Live 24/7 Help Desk

Tags: