रोबोटिक बटरफ्लाय, अँनिमल अम्युजमेंट  प्रदर्शनाचे बेळगावात शानदार उद्घाटन

Apr 16, 2024 - 11:27
 7
Google  News Join WhatsApp Join Telegram Live

रोबोटिक बटरफ्लाय, अँनिमल अम्युजमेंट   प्रदर्शनाचे बेळगावात शानदार उद्घाटन

Panchayat Swaraj Samachar News Desk.

 बेळगाव- "कर्नाटकाच्या विविध भागात अशा प्रकारची प्रदर्शने आयोजित करून बेळगावात आलेल्या सायमन एक्झिब्युटर्स यांचे हे प्रदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिना आहे. समस्त बेळगावकर याचे निश्चित स्वागत करतील असा मला विश्वास वाटतो" असे उद्गार बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि रोटरीचे माजी गव्हर्नर अविनाश पोतदार यांनी बोलताना व्यक्त केले. सीपीएड मैदानावर सुरू करण्यात आलेल्या अम्युजमेंट फन फेअर, रोबोटिक बटरफ्लाय व अँनिमल प्रदर्शनाचे उद्घाटन अविनाश पोतदार यांच्या हस्ते फीत सोडून व दीप प्रज्वलित करून सोमवारी सायंकाळी करण्यात आले. सायमन एक्झिब्युटर्सचे संचालक नागचंद्रा यांनी श्री पोतदार यांचे पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह आणि भेट वस्तू देऊन स्वागत केले आणि कर्नाटकाच्या विविध शहरात आजवर अशी प्रदर्शने आम्ही आयोजित केली असून बेळगावात हे पहिलेच प्रदर्शन आहे. ज्या प्रदर्शनात फुलपाखरांचे आणि प्राण्यांचे भव्य दिव्य असे खेळ आयोजित करण्यात येतात, कर्नाटक राज्याची स्थापना होऊन पन्नास वर्षे झाली त्याचे औचित्य साधून आम्ही राज्यभरात "कर्नाटका संभ्रम 50" हे प्रदर्शन आयोजित करीत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आजवर झालेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री, सिने कलाकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते व क्रिकेट खेळाडूंची छायाचित्रे वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली आहेत" अशी माहिती एम एस नागचंद्रा यांनी दिली.

     या प्रदर्शनात रोबोटिक बटरफ्लाय शो होणार असून ते बेळगावकरांचे खास आकर्षण ठरेल. याचबरोबर रोबोटिक ॲनिमल किंग्डम पार्क, सिंगापूर टॉवर्स आणि सेल्फी पार्क ही या अम्युजमेंट पार्कची विशेष आकर्षण राहणार आहेत. अनेक स्टॉल्स असलेल्या या प्रदर्शनात ग्राहक उपयोगी वस्तू, गेम्स, फॅन्सी टॉईज व फूड स्टॉल्स राहणार असून प्रख्यात कंपनीची लेदर प्रॉडक्ट्स व हँडवर्क प्रॉडक्टस, कुशन सोफासेट व डायनिंग टेबल, खुर्जा क्राँकरी, राजस्थानी लोणचे, पापड, मुखवास नाईस इ-बाईक व हेल्मेट, खादी शर्ट, गँस स्टोव्ह, उपलब्ध राहणार आहेत. बच्चे कंपनीचे मनोरंजन करणारे अनेक गेम्स हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट राहील.

      शिमोगा, म्हैसूर, बेंगलोर, दावणगिरी, मंगलोर अशा कर्नाटकातील विविध शहरात यशस्वीरित्या आयोजित करून हे प्रदर्शन सायमन एक्जीबिशनच्या वतीने आता बेळगावात सुरू केले आहे. रोज सायंकाळी 5 ते रात्री 9.30 पर्यंत हे अम्युजमेंट पार्क सीपीएड मैदानावर चालू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. प्रकाश कालकुंद्रीकर

यांनी सर्वांचे स्वागत व आभार मानले. याप्रसंगी अनेक निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google News Join Facebook Live 24/7 Help Desk

Tags: