राष्ट्रवाद आणि हिंदुत्व नव्हे, तर जात मतदारांवर सर्वाधिक टाकतेय प्रभाव

Apr 25, 2024 - 09:36
 18
Google  News Join WhatsApp Join Telegram Live

राष्ट्रवाद आणि हिंदुत्व नव्हे, तर जात मतदारांवर सर्वाधिक टाकतेय प्रभाव

Panchayat Swaraj Samachar News Desk.

दिल्ली : निवडणुकीत राष्ट्रवाद आणि हिंदुत्व हे निवडणुकीचे मुद्दे बनताना दिसत नाहीत. मतदार अजूनही जातीबाबत अधिक जागरूक आहेत. निवडणूक आणि मतदान या दोन्हींवर जातीवादाचे वर्चस्व आहे. 

अब की बार ३७० पार आणि एनडीए के साथ ४०० पार या घोषणा भाजपने दिल्या. पण, दुसऱ्या टप्प्यापूर्वी यावरून काळजी वाढली आहे. २०१९ च्या निवडणुकांप्रमाणेच खूप प्रयत्न करूनही निवडणुका राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर येत नाहीत. आतापर्यंत जे कल आले आहेत, त्यावरून असे दिसून येत आहे की, जातीवादाचा प्रभाव मतदारांवर अधिक प्रमाणात आहे

केवळ उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकच नाही, तर देशातील अनेक राज्यांमध्ये जात मतदारांवर सर्वाधिक प्रभाव टाकताना दिसत आहे. राष्ट्रीय मुद्दे सीएए, एनआरसी, राष्ट्रीय सुरक्षा, पाकिस्तान, कलम ३७०, समान नागरी कायदा, देशाचा विकास, जी २० हे अद्याप निवडणुकीचे मुद्दे बनलेले नाहीत. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांमध्ये राम मंदिर अग्रस्थानी होते, पण आजपर्यंत राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा बनलेला नाही. त्याऐवजी, यादव, जाट, गुर्जर, मीणा, राजपूत, कुशवाह, कुर्मी, जाटव, रेड्डी, लिंगायत, वोकलिंगा समाजातील असणे हा एक मोठा मुद्दा बनला आहे. हा मुद्दा मतदारांना थेट उमेदवारांशी जोडणारा आहे, असे चित्र पहायला मिळत आहे.

भाजप म्हणते काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लीम लीगचाकाँग्रेसच्या जाहीरनाम्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप मुस्लीम लीगचा जाहीरनामा म्हणत आहे. काँग्रेस लोकांचे सोने, चांदी आणि मंगळसूत्रही हिसकावून घेईल, असे पंतप्रधान मोदी म्हणत आहेत. सॅम पित्रोदा यांनी वारसा कर लागू करण्याच्या वक्तव्यानंतर भाजपला काँग्रेसवर हल्लाबोल करण्याची जोरदार संधी मिळाली आहे.

भाजपकडे मोठा मुद्दा...मंगळसूत्र आणि मालमत्ता वाटप हे दोन्ही निवडणुकीचे मुद्दे बनले आहेत. काँग्रेसने सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याला वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे. मात्र, यामुळे निवडणुकीच्या काळात भाजपच्या हाती मोठा मुद्दा मिळाला आहे. याचे भांडवल करण्याची सर्व नेत्यांची तयारी सुरू आहे. भाजपचे सर्व केंद्रीय मंत्री, नेते एकाच सुरात काँग्रेसच्या या विधानाचा विरोध करत आहेत. 

Google News Join Facebook Live 24/7 Help Desk

Tags: