लोकसभा निवडणुकीत कुणाचा विजय होणार? डेलिहंटच्या सर्व्हेतील देशवासियांची ‘मन की बात’ काय?

Apr 17, 2024 - 18:17
 13
Google  News Join WhatsApp Join Telegram Live

लोकसभा निवडणुकीत कुणाचा विजय होणार? डेलिहंटच्या सर्व्हेतील देशवासियांची ‘मन की बात’ काय?

Panchayat Swaraj Samachar News Desk.

लोकसभा निवडणूक 2024चं बिगुल वाजलं आहे. एका बाजूला सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आपल्या आपल्या विजयाचा दावा करत आहेत. तर आपल्या पसंतीचं सरकार काय असावं याचा विचारही मतदारांनी करून ठेवला आहे. या सर्व धामधुमीत डेलिहंटने जनताची नस शोधण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाचं पारडं जड आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न डेलिहंटने एक सर्व्हे केला आहे. त्यासाठी 11 भाषिक राज्यात 77 लाख लोकांशी चर्चा करण्यात आली. या सर्व लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. त्या आधारे एक रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. या सर्व्हेत 64 टक्के लोकांनी देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधानपदासाठी पसंती देण्यात आल्याचं दिसून आलं आहे. मोदी हेच पुन्हा पंतप्रधान असावेत असं 64 टक्के लोकांना वाटतं. तर राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत असं 21.8 टक्के लोकांनी सांगितलं. त्याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान म्हणून 4.3 टक्के लोकांनी तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 1.3 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर इतरांना पंतप्रधानपदासाठी 8 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

डेलिहंटच्या सर्व्हेत 63 टक्के लोकांनी देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकार येणार असल्याचं मान्य केलं आहे. यावेळी देशातील अधिक राज्यात भाजप विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं दिसत आहे. सर्व्हेनुसार, कर्नाटकातील 72 टक्के लोकांना 2024मध्ये एनडीए विजयी होईल असं वाटत आहे. तर कर्नाटकातील 20 टक्के लोकांना इंडिया आघाडी विजयी होईल असं वाटत आहे. याच प्रकारे महाराष्ट्रात 58 टक्के लोकांनी भाजपच्या बाजूने तर 33 टक्के लोकांनी इंडिया आघाडीच्या बाजूने मत व्यक्त केलं आहे.

तामिळनाडूत हा आकडा 50-50 टक्के आहे. दोन्ही आघाड्यांना 45-45 टक्के मते मिळताना दिसत आहे. तेलंगणा, पश्चिम बंगाल, दिल्ली, आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात 65 टक्क्याहून अधिक लोकांनी एनडीएच्या बाजूने आपलं मत व्यक्त केलं आहे. तर सुमारे 25 टक्के लोकांनी इंडिया आघाडीच्या बाजूने मत व्यक्त केलं आहे. ओडिशात मात्र भाजपला विजय मिळताना दिसत आहे.

या सर्व्हेत ओडिशात सर्वाधिक 74 टक्के लोकांनी एनडीएची बाजू उचलून धरली आहे. या राज्यात 10 टक्के लोकांनी इंडिया आघाडी जिंकणार असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीच्या बाबत मात्र भाजपसाठी चांगली बातमी नाही. भाजप दिल्लीतील सर्व सातही जागा जिंकणार असल्याचा दावा करत आहे. पण फक्त 68 टक्के दिल्लीकरांनी भाजपच्या म्हणण्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे. तर 23 टक्के लोकांनी भाजपच्या विरोधात मत व्यक्त केलं आहे.

Google News Join Facebook Live 24/7 Help Desk

Tags: